🕒 1 min read
Deepak Kesarkar । मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केला आहे. तसचे भाजप सोबत सत्ता देखील स्थापन केली आहे. मात्र हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा केला. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील दिले आहे. दरम्यान शिवसेनेच्या चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्वाचा सल्ला दिला होता. यानंतर पवारांच्या या सल्ल्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
केसरकर म्हणाले कि, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी लक्ष द्यायला हवे जर आपण मित्र पक्ष आणि मोठ्या पक्षासोबत काम करत असाल तर त्यांना सांभाळणे आपले काम आहे. प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करतो. राष्ट्रवादी वाढवताना पवार साहेब तुम्ही किती कष्ट केले ते कळेल, त्यावेळी त्यांना अनेक पक्ष फोडावे लागले असते. पण हा राजकारणाचा भाग आहे, असं ते म्हणाले. तसेच पुढेच त्यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणले होते शरद पवार ?
धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात ते चिन्ह करू शकतात. माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत, असं म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Jalna । जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा, तब्बल 58 कोटी कॅशसह 32 किलो सोनं जप्त, 390 कोटीची मालमत्ता जप्त
- Shiv Sena । दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे नितीशकुमारांनी दाखवून दिले; शिवसेनेचं टीकास्त्र
- Raosaheb Danve | महिलांना पुढील विस्तारात संधी मिळेल – रावसाहेब दानवे
- Sanjay Rathod । एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात संधी का दिली; संजय राठोडांनीच सांगितलं यामागील कारण
- Chitra Wagh | “…तर तुम्हाला करुणा मुंडेंची माफी मागावी लागेल” ; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

