Share

Jalna । जालन्यात इनकम टॅक्सचा मोठा छापा, तब्बल 58 कोटी कॅशसह 32 किलो सोनं जप्त, 390 कोटीची मालमत्ता जप्त

Published On: 

Jalna । जालना : राज्यात आज एक मोठी आणि आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना समोर आली आहे. जालना जिल्यातील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. या छाप्यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची रक्कम आणि 32 किलो सोन्यासह 390 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. इनकम टॅक्स विभागाच्या तब्बल 100 अधिकाऱ्यांनी एकत्रित ही छापेमारी केली.

तसेच ज्यांच्यावर कारवाई झाली त्यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर व व्यापाऱ्याचाही समावेश आहे. ही राेकड माेजण्यासाठीपथकाला तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकारी कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पाेहोचले हाेते. वऱ्हाडाच्या गाड्यांमधून येत प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. दुल्हन हम ले जाएंगे, अशा स्वरुपाचे स्किकरही गाड्यांवर लावण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

दरम्यान, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी काेट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकाॅर्डवर न आणता राेखीत व्यवहार केले आहेत. यातून प्राप्तिकर बुडवल्याचा संशय हाेता. इनकम टॅक्स विभागाने या व्यावसायिकांवर छापा टाकला. या व्यावसायिकांची नावं अद्याप समोर आलेली नाही. औरंगाबाद पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर स्टील व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जालन्यात एक ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांमधून जात एकूण पाच पथकांनी स्टील व्यावसायिकांच्या घरावर आणि ऑफिसवर छापा टाकला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!