Share

संजय दत्तने आलिया भट आणि रणबीर कपूरला लग्नावरून दिले ‘हे’ सल्ले

Published On: 

मुंबई : सध्या सगळीकडे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Aalia Bhat) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाचीच चर्चा केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. आलिया आणि रणबीरने त्यांच्या लग्नाबाबत सर्वांना सांगितल्यापासून त्यांचे फॅन्स खूपच खूश झाले आहेत. तसेच त्यांच्या लग्नावरून अनेक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींनी आनंद व्यक्त केला आहे. तर अशातच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनीही आलिया-रणबीरला लग्नाबाबत काही सल्ले दिले आहेत.

आलिया माझ्या डोळ्यासमोरच लहानाची मोठी झाली आहे. लग्न ही एक अशी कमिटमेंट आहे, ज्यामध्ये आलिया आणि रणबीर या दोघांनाही टिकवून रहावं लागणार असल्याचं संजय दत्तने म्हटले आहे. संजय दत्त यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना आलिया आणि रणबीरच्या लग्नासंबंधी विचारण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले.

तसेच लग्न झाल्यानंतर दोघांना प्रत्येक संकटात एकमेकांचा हातात-हात धरणे गरजेचं आहे. त्याचबरोबर लवकर लग्न करा, मुलं बनवा, असं म्हणत संजय दत्तने आलिया आणि रणबीरला आनंदी राहण्याचा सल्लाच दिला आहे.

दरम्यान, आलिया आणि रणबीरचं लग्न येत्या 13 ते 15 एप्रिल या तारखेमध्ये असल्याचं समजतं आहे. या दोघांच्या लग्नाला घेऊन अनेक बॉलिवूड कलाकार आणि त्याचबरोबर आलिया आणि रणबीरचे फॅन्स उत्सुक असल्याचं दिसून येतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!