🕒 1 min read
मुंबई : सध्या सर्व राजकीय पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली असल्याची पाहायला मिळत आहे. भाजप देखील मुंबई महापालिकेच्या रणांगणात रणशिंग फुंकणार आहे, येत्या १ मे म्हणजे महाराष्ट्र दिनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची जाहीर होणार सभा असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मागील २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. तेव्हा काही जागांच्या फरकाने शिवसेनेने मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवली. गेल्या निवडणुकीत भाजपाने थेट ३० हून ८० जागांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका ताब्यात घ्यायचीच असा चंग भाजपा नेत्यांनी बांधला आहे. त्यासाठी मुंबई भाजपाची कोअर कमिटी बनवण्यात आली आहे.
मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपा आक्रमकपणे लावून धरणार असल्याचे कळते. त्यामुळे १७ एप्रिलपासून मुंबईत भाजपा पोलखोल अभियानाची सुरुवात करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून महापालिकेत झालेला भ्रष्टाचार आणि शिवसेना नेत्यांवर होणारी कारवाई याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
“सेव्ह विक्रांतचा निधी भाजपच्या खात्यात जमा”; किरीट सोमय्यांच्या वकिलाकडून गौप्यस्फोट
“सेटिंग करण्याचा प्रयत्न केला पण पप्पू…”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला
मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
“जनतेचे पैसै हडपणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची…”, राष्ट्र्वादीची टीका
‘विक्रांत’साठी जमले फक्त ११ हजार रुपये; किरीट सोमय्यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
