🕒 1 min read
मुंबई : राज्यात भारनियमन पुन्हा वाढले असून राज्य सरकारच्या मुख्य अभियंत्यांनी भारनियमाची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार दिवसभर आठ तास किंवा रात्रीच्या आठ तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘सावध! ऐका पुढल्या हाका…टँकरमुक्तीतून पुन्हा टँकरयुक्त, भारनियमनमुक्तीतून पुन्हा भारनियमनाकडे, राज्यात केवळ आणि केवळ भ्रष्टाचार,‘नो गव्हर्नन्स’मुळे जनता हैराण. परिणाम दिसू लागले असून अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे’, असे फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘आजपासून महाराष्ट्रात भारनियमन पुन्हा सुरू झाले. यंदा उन्हाच्या झळा तीव्र असताना जनता घामाघूम आणि राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप महाविकास आघाडीने अखेर केलेच.’ तसेच वाफाळ शब्दांपेक्षा प्रशासकीय कौशल्याचा थोडा कस लावून जनतेला तत्काळ दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे, असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
- “महाराष्ट्र दिनी भाजप मुंबई महापालिकेच्या रणांगणात…”; फडणवीसांची जाहीर सभा
- IPL 2022 : जेव्हा हार्दिकच्या तळपायाची आग मस्तकात जाते..! मॅचदरम्यान शमीवर काढला ‘असा’ राग; VIDEO व्हायरल!
- सदावर्तेंनी घेतलेल्या रकमेमध्ये खोत आणि पडळकरांचाही वाटा आहे का?; राष्ट्रवादीचा सवाल
- IPL 2022 CSK vs RCB : आज धोनीची बॅट तळपणार? वाचा कोणत्या संघाचं पारडं आहे जड
- निल सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
