मुंबई : आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात कालच किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला होता. याच प्रकरणात किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे देखील सहआरोपी आहेत. आज न्यायालयात निल सोमय्या यांच्या जामीन अर्जावर सुनवाई होती. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच नील सोमय्या यांचा देखील जमीन अर्ज फेटाळला आहे.
सोमय्या पिता पुत्रांनी आपल्याला उच्च न्यायालयाकडे जाईपर्यंत तरी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. परंतु न्यायालयाने त्यांची ही मागणी देखील फेटाळली गेली आहे. यामुळे आता सोमय्या पितापुत्राच्या डोक्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असणार आहे. यामुळे सोमय्या पितापुत्रांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या हे सध्या नॉट रिचेबल आहेत. परंतु ते समाजमाध्यमांद्वारे आपली बाजू मांडत आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांची एक जुनी पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात ते म्हणत होते की, राज्यपालांना मुंबईकरांकडून १४० कोटी रुपये जमवून देण्यास तयार आहोत. त्यातून आयएनएस विक्रांतसाठी संग्रहालय उभं करता येईल.
किरीट सोमय्या यांनी विक्रांतसाठी जमवलेला निधी भाजपला दिला, अशी माहिती त्यांच्या वकीलांनी दिली होती. तो निधी नेमका किती होता याची माहिती मिळाली नव्हती. आता सोमय्या यांनीच हा निधी ११००० हजार रुपयांचा होता असा दावा केला आहे. १४० कोटी रुपये जमवू असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला होता. पण तो निधी ११००० रुपयांचा आहे, असा दावा केल्यानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


