🕒 1 min read
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. मागच्या काही दिवसांपूर्वी त्याचा पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता अक्षय कुमार त्याच्या ‘कॅप्सूल गिल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अक्षय कुमारचा ‘कॅप्सूल गिल’ चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या लूकची सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अक्षय कुमार शीख सरदारच्या वेशामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या डोक्यावर पगडी, वाढलेली दाढी, आणि चष्मा अक्षय कुमारचा लूक अजून खास बनवत आहे. अक्षय कुमारच्या लूकने चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
IT'S OFFICIAL… AKSHAY KUMAR – POOJA ENTERTAINMENT REUNITE… #AkshayKumar joins hands with #PoojaEntertainment [#VashuBhagnani] yet again… Filming begins in #London… Directed by #TinuSureshDesai [#Rustom]… #FirstLook… pic.twitter.com/rOb0tIUpd6
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2022
दरम्यान, अक्षय कुमारचे चाहते त्याच्या येणाऱ्या ‘कॅप्सूल गिल’ या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. ‘कॅप्सूल गिल’ या चित्रपटाची कथा ही कोळसा खाण अभियंता जसवंत सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा जसवंत सिंह यांच्या मुख्य भूमिकेमध्ये दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
