Share

Balasaheb Thorat: “… हा OBC समाजावरील अन्याय आहे”, बाळासाहेब थोरात यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका OBC आरक्षणाशिवाय होणार आहेत हा OBC समाजावरील अन्याय आहे. OBC आरक्षणासंदर्भात बांठिया समितीचा अहवाल तयार आहे, त्यामुळे आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

तसेच या निर्णयावर राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी म्हटले आहे.

तसेच ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पहिल्या दिवसापासून स्वतः यात जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांटिया आयोगाने इम्पिरेकल डेटा गोळा करून अहवालही तयार केला आहे. अशी माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!