मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. या मालिकेचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. या मालिकेतील नुकतंच नेहा आणि यशचे लग्न पार पडले आहे. नुकतंच किचन कल्लाकार’च्या मंचावर समीर आणि शेफाली या दोघांचा लग्न लावून दिल. यावेळी या दोघांनी एकमेकांसाठी काही खास उखाणे घेतले आहेत. या खास उखण्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत.
यावेळी उखाणा घेताना समीर म्हणाला, “तुमच्या सगळ्यांच्या उत्साहाने माझी ही काय अवस्था झाली, मला वाटलं मिळेल एखादी नेहासारखी पण मिळाली शेफाली”. तर नंतर शेफालीनेही समीरसाठी एक गमतीशीर उखाणा घेतला. “मोगऱ्याचं फुल हलत कसं डुलुडुलु, समीरराव आमचे डुकराचं पिल्लू” असा उखाणा शेफालीने घेतला.
https://www.instagram.com/reel/CfgytCWJj-G/?igshid=YmMyMTA2M2Y=
याचा एक व्हिडीओ झी मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या याच्या खूप चर्चा आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, या मालिकेला अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे विशेष पसंती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :


