मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील या वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी निवडणुका लागतील असं म्हटलंय. राज्यात सत्तांतरानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. ती लढाई न्यायालयात सुरुच राहिली. परंतु, आम्हीही मध्यवधी लागणार असे संकेत मिळत असल्यानं त्या दृष्टीनं लढाईसाठी तयारी करत असल्याचं राऊत म्हणाले.
या वक्तव्यानंतर आज संजय राऊत यांनी ट्विटव्दारे पुन्हा एकदा इशारा दिलाय. राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, रुकने वाला वजह ढूंढ़ता हैं.. और जाने वाले बहाने… राहत..! असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये राऊतांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळं संजय राऊत यांचा निशाणा नेमका कोणावर याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
रुकने वाला वजह धूंडता हैं..
और जाने वाले बहाने…
राहत.. pic.twitter.com/GVqGisk5Ux— Sanjay Raut (@rautsanjay61) July 5, 2022
दरम्यान, आज सामानाच्या अग्रलेखात म्हंटल आहे कि, सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे त्यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले. बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. शिंदेंचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्यासोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत.बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे! असं म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या


