मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर अनेक कलाकार त्यांची मते मांडत असतात. यामध्ये अभिनेते किरण माने राजकीय घडामोडींवर सतत आपले मत मांडत असतात. नुकतंच किरण माने यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.
किरण मानेंनी फेसबुक पोस्ट करत लिहिले की, “साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात !”
https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10225508524247570
किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांची ही फेसबुक पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे. नेटकरी या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘उरले सुरले तोंडी लावायला ठेवलेत का लोणचं म्हणून सर’, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तीन पाकळ्या नेपाळी राणेंना टाकलं नाही म्हणूनजाहीर निषेध’, अशा वेगवेगळ्या कमेंट सोशल मीडिया युजर्स करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

