Share

Shivsena : विदर्भातही शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता?, नागपुरातील संदीप इटकेलवार ‘नॉट रिचेबल’

Published On: 

नागपुर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. या सत्तासंघर्षात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी स्वपक्षाविरोधातच बंड पुकारलं होत. यानंतर शिवसेनेला मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली.

मात्र उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या राज्यभरातील जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार अनुपस्थित होते. तेही शिंदे गटात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यानंतर आता विदर्भातही सेनेला सौम्य धक्के बसू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी झाले गेले विसरून नव्याने सेना उभारण्याचा संकल्प केला आहे.

दरम्यान, कालच्या बैठकीत लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!