🕒 1 min read
मुंबई : काल उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली.कालच्या बैठकीत लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील या वक्तव्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी निवडणुका लागतील असं म्हटलंय. राज्यात सत्तांतरानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. ती लढाई न्यायालयात सुरुच राहिली. परंतु, आम्हीही मध्यवधी लागणार असे संकेत मिळत असल्यानं त्या दृष्टीनं लढाईसाठी तयारी करत असल्याचं राऊत म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या राज्यभरातील जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संदीप इटकेलवार अनुपस्थित होते. तेही शिंदे गटात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यानंतर आता विदर्भातही सेनेला सौम्य धक्के बसू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी झाले गेले विसरून नव्याने सेना उभारण्याचा संकल्प केला आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
