मुंबई : येणाऱ्या जुलै महिन्यात महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यापैकी पाच जागांवरील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक, शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक अशी उमेदवारी निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेवरून राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या वेळी ही जागा राष्ट्रवादीने मित्रपक्षांच्या सहकार्याने निवडून आणली होती, आता मात्र या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे, इतर मित्रपक्षांनी शिवसेनेला सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे लढण्यास इच्छुक होते, परंतु शिवसेना अपक्षांना पाठींबा देणार नसल्याने, याबाबत बराच वादविवाद घडून आला.
राज्यसभा खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांचा कार्यकाळ आता संपत आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे त्यांनी आवाहन केले होते. राष्ट्रवादीने सुरुवातीच्या काळात छत्रपतींना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता आपली भूमिका बदलून राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. सेनेने छत्रपतींना शिवसेना प्रवेशाची ऑफर दिली होती. राजेंनी ही ऑफर धुडकावल्याने राज्यसभेचा मार्ग त्यांच्यासाठी कठीण झाला. शिवसेनेने कोल्हापुरचे शिवसेना अध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी दिली. आता एक मोठी बातमी सूत्रांकडून येत आहे.
महाराज…
तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय…मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी…
मी बांधील असेन तो फक्त जनतेशी… pic.twitter.com/UnOir6CWSr— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 26, 2022
संभाजीराजे राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याीची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. माझी बांधिलकी जनतेशी असल्याचे त्यांनी पोस्ट केली आहे. आता याबाबत चर्चा होत आहे. महाविकास आघाडी सरकाच्या आमदारांनी सहकार्य करण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यांना आता माघार घ्यावे लागत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपने ही राजेंना समर्थन दिलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या :


