Share

IPL 2022 LSG vs RCB : कार्तिक रॉक्स, राहुल शॉक्स..! ‘तो’ षटकार पाहून विराटनं तर सीटवरून मारली उडी; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा एलिमिनेटर सामना बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG vs RCB) यांच्यात खेळला गेला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने लखनऊचा १४ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर आयपीएल २०२२ मधील लखनऊचा प्रवास संपला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ४ गडी गमावून २०७ धावा केल्या. विजयासाठी २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊच्या संघाला निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावा करता आल्या.

रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी बंगळुरूला सामना जिंकून देण्यात विशेष भूमिका बजावली. पाटीदारने ११२ धावा केल्या, तर दिनेश कार्तिकने ३७ धावांची आक्रमक खेळी केली. या सामन्यादरम्यान कार्तिकने मोठा षटकार ठोकला. हा षटकार पाहून विराट कोहलीने आपल्या सीटवर उडी मारली. विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. सुरुवातीला तो खूप संयमी खेळला. त्याच्या बॅटवर चेंडू नीट येत नव्हता. यादरम्यान त्याचा एक झेलही सुटला. एकेकाळी या सामन्यात दिनेश कार्तिकने ९ चेंडूत ६ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याने वेग वाढवला. कार्तिकने पुढच्या १० चेंडूत २५ पेक्षा जास्त धावा केल्या. १७व्या षटकात त्याने लखनऊचा गोलंदाज आवेश खानच्या चेंडूवर सलग ३ चौकार मारले. दुष्मंथा चमीराच्या शेवटच्या षटकात त्याने षटकार ठोकला. कार्तिकचा हा षटकार पाहून विराट कोहलीने आपल्या सीटवरून उडी मारली. त्याचवेळी लखनऊचा कर्णधार केएल राहुलच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.

दिनेश कार्तिकने रजत पाटीदारसोबत ४१ चेंडूत ९२ धावांची भागीदारी केली. कार्तिकने आक्रमक पवित्रा घेत २३ चेंडूत ३७ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याच्यामुळेच बंगळुरू संघाला २०७ धावांची मोठी धावसंख्या उभारता आली.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!