अहमदनगर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी दिसून येत आहेत. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची स्पर्धाच सुरु आहे. सध्या ओबीसी आरक्षणावरून भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगत आहे. आता भाजपचे नेते आणि खासदार सुजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना संपवण्यासाठी झालेला आहे. संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरू असताना या विषयाची सुरुवात कोणी केली. याला ठिणगी कोणी लावली आणि आज आगीत कोण जळतंय हे सर्व महाविकास आघाडीचं चित्र जनता पाहत आहे,” असे खासदार सुजय विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.
खासदार सुजय विखे पुढे म्हणाले, “शिवसेना हा पक्ष गेल्या ३ वर्षात फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीपूर्वीच त्यांना पाठिंब्याची घोषणा केली. त्यापूर्वी हा विषय चर्चेत देखील नव्हता. पाठिंब्याची घोषणा करून हा विषय चर्चेला आणला आणि तो विषय सेनेकडं वळविण्यात आला.आज जिथून या चर्चेला सुरुवात झाली, ज्या व्यक्तींनी या चर्चेला वाचा फोडली त्यांच्यावर आज कुठलाच आरोप नाहीय. सगळा दोष हा शिवसेनेला दिला जात आहे, असं विखेंनी नमूद केलंय. राज्याच्या निधी पैकी ७६ टक्के बजेट हे राष्ट्रवादी घेत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून त्यांना निधी नाही, ते फक्त फक्त टीकेचा धनी, तरी देखील सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे”
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

