Share

“सर्वज्ञानी माणसाने इतके अस्वस्थ होण्याची…”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

Published On: 

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांचे  नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावरूनच मराठा संघटनाने सेनेने राजेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका केली आहे. यावर संजय राऊत यांनी खंजीर खुपसला अशी भाषा कुणी करु नये असे म्हटले होते. यावरच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“‘खंजीराची भाषा करु नका,बोलताना जरा सांभाळून बोला’, मराठा संघटनांवर राऊत भडकले म्हणे. खंजीर शब्द दोघांच्याही वर्मावर भलताच आरपार खुपसला जातो वाटतं अन्यथा सर्वज्ञानी माणसाने इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही.”, असा टोला चित्रा वाघ यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान छत्रपती घराण्याचे वारस संभाजीराजे हे स्वत:हून शिवसेनेकडे मदत मागण्यासाठी गेले होते. मात्र, शिवसेनेने त्यांना सन्मानित करण्याऐवजी उमेदवारी नाकारली. असे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे. तर  गेल्या १५ दिवसांमधील घडामोडी समजून घ्या. छत्रपतींचा, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही संभाजीराजेंना द्यायला तयार झालो. यापेक्षा शिवसेना अजून काय करू शकते हे सांगावं. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!