Share

Sambhaji raje Chhatrapati | “विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार”; छत्रपती संभाजीराजेंचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे मेटेंच्या समर्थकांसह अनेक नेत्यांनीही या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. हा अपघात आहे कि घातपात आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला या अपघातासाठी जबाबदार ठरवले आहे.

गाडीचा अपघात झाल्यांनतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती, मेटेंच्या चालकाने दिली आहे. 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. असा आरोप मेटे यांच्या ड्रायव्हरने केला आहे. त्यावरूनच संभाजीराजे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. “सर्वप्रथम मी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहतो. या अपघाताची सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. परंतु त्यांच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकारचा जबाबदार आहे. कारण अपघात झाल्यानंतर मेटे यांना एका तासाने आपत्कालीन मदत मिळाली. या सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे?”, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

तसेच ते पुढे असंही म्हणाले कि, “मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नेहमीच रहदारी असते. त्यामुळे तिथे आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवणाऱ्या २-३ गाड्या नेहमीच असायला हव्यात. असे अपघात झाल्यास तात्काळ मदत पोहोचावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी.” तर मेटेंना लवकर ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने मेटेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच अपघात झाल्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात दिरंगाई झाली का?, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!