Share

Ajit Pawar | हरहुन्नरी आणि सर्वांना हवा असा वाटणारा सहकारी आज आम्ही गमावला – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं. मात्र, या अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यानंतर विनायक मेटेंच्या निधनावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हरहुन्नरी आणि सर्वांना हवा असा वाटणारा सहकारी आज आम्ही गमावला असेही अजित पवार म्हणाले.

विनायक मेटे यांच्या निधनांनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना त्यांनी याबाबत भाष्य केले. “आजची पहाट सगळ्यांच्या दृष्टीकोनातून काळी पहाट झाली. दुर्देवाने रात्रभर प्रवास करून येत असताना ड्रायव्हरला कुठतरी डुलकी लागली असवी आणि त्यातून हे सगळं घडलंय, असे माझे स्वत:चे मत आहे. आम्ही सर्वे राजकीय क्षेत्रातील राजकीय नेते आहोत. खरेतर किंवा कुठल्याही क्षेत्रातील असलेल्या लोकांनी रात्री प्रवास करणे टाळले पाहिजेत. परंतु, वेळ महत्वाची असते, त्यामुळे ती टाळूनही चालत नाही”, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या अपघातानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केले की, या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. त्यानुसार त्यांनी ती करावी. त्यातूनच नेमके काय झाले याचे चित्र स्पष्ट होईल. कारण कंटेनर आणि कारचा वेग किती असतो याची माहिती आपल्या सर्वांना आहे”, असेही अजित पवार यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!