Share

Neelam Gorhe | मेटे जे प्रश्न मांडत होते त्याला न्याय देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल- नीलम गोऱ्हे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या जाण्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील मेटेंच्या निधनावर हळहळ व्यक्त केली.

विनायक मेटे यांना नीलम गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्या म्हणाल्या कि, “माझा आणि श्री. विनायकराव मेटे यांचा 25 वर्षांपासून परिचय होता. ते सातत्याने विधिमंडळामध्ये अनेक सामाजिक प्रश्नांबरोबरच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही भूमिका मांडत होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंशीही त्यांचा सुसंवाद होता. १९९२-९३ साली अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मेटेंची आणि अण्णासाहेब पाटील यांची चर्चा झाली होती. त्यातून बरेच प्रश्न पुढे मार्गी लागले होते. नंतरच्या काळामध्ये विधिमंडळातही त्यांनी संसदीय कामकाज फार चांगल्या पद्धतीने केलं. आज या अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं याचा मला अतिशय धक्का बसलेला आहे. सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या नेत्याला आपण गमावलं आहे. मी विधान परिषदेची उपसभापती म्हणून तर श्रद्धांजली व्यक्त करतच आहे पण शिवसेनेच्या उपनेत्या या नात्यानेही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. आणि पुढील काळामध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून मेटे जे प्रश्न मांडत होते त्याला न्याय देणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अजित पवारांचं मोठं विधान

“मेटे हे मराठा समाजाच्या न्यायासाठी आणि आरक्षणासाठी झगटणारे नेते होते. सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते नेहमीच मराठा समाजाचे प्रश्न घेऊन येत आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, यासाठी त्यांनी खूप मोठा लढा दिलायं. तर रात्रभर विनायक मेटेंचा प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे असल्यामुळे रात्रीचा प्रवास सुरू होता. माझ्या म्हणण्यानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात घडला असावा.”, अशी शंका अजित पवार यांनी उपस्थित केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!