Share

Tanaji sawant | मराठा आरक्षणाचा लढा चालूच ठेवणे हीच मेटेंना खरी श्रद्धांजली- तानाजी सावंत

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या जाण्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बार्शी येथे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विनायक मेटे यांना शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहिली.

शोकसभेत बोलताना सावंत म्हणाले कि, “गेल्या चार दिवसापूर्वी माझी आणि त्यांची भेट झाली होती. येत्या काळात मराठा आरक्षणाचा लढा कसा द्यायचा यावर चर्चा झाली.राज्यातील अधिवेशनानंतर मराठा आरक्षणाचा पुढील टप्पा कसा पार करायचा हे पण ठरवलं होतं. न्यायालयात नेमकी काय भूमिका घ्यायची याचं सगळं नियोजन केलं होतं. चार दिवसापूर्वी प्रत्यक्षात भेटलेला माणूस आता आपल्यात नाही हे बुद्धीला पटत नाहीये आणि सहनही होतं नाहीये. खरं तर प्रत्येकावर कधी ना कधी मृत्यूचा घाला घातला जाणार आहे. मात्र मेटे यांचं असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. त्यांच्या जाण्याने समाजाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आम्ही मराठा आरक्षणाचा लढा भविष्यातही सुरु ठेवू, हीच मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल.” त्याचबरोबर ईश्वर मेटेंच्या कुटुंबियांना आणि मराठा समाजाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

दौरे केले रद्द

डॉ. तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदाच उस्मानाबादमध्ये आले आहेत. त्यामुळे समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र मेटेंच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आज कुठेही हारे-तुरे सत्कार स्वीकारणार अशी भूमिका घेतली आहे. तसेच त्यांचे परंडा, वाशी, कळंब, भूम आणि उस्मानाबाद तालुक्यातील सर्व दौरे रद्द केले आहेत. बीड जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा जवळ जवळ असल्याने सावंत आणि मेटे यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. त्यामुळेच त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!