Share

‘बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली, याची जाण ठेवा’, ‘त्या’ घटनेवरून संभाजी छत्रपती संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बेळगाव आणि परिसरातील शिवप्रेमी आक्रमक झाले असून नागरिकांनी धर्मवीर संभाजी चौकात जमून सर्व रस्ते बंद केले आहेत. या घटनेवरच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती हि शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.’ अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान यातच काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा (revolutionary Sangoli Rayanna) यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या गळ्याभोवती लाल-पिवळा झेंडा गुंडाळला असून हात कापडाने बांधले आहेत. यानंतर सदाशिनगर बंगळूर येथे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे याभागात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. तर खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात कलम १४४ जारी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!