Share

महाराष्ट्र ‘हे’ कदापि सहन करणार नाही; काँग्रेसचा इशारा

Published On: 

मुंबई: कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. यावरच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधत संताप व्यक्त केला आहे.

‘बंगळुरूला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. भाजपा मोदींची तुलना शिवरायांशी करते. चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असे म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही.’ असे ट्वीट करत सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच भाजपला इशारा दिला आहे.

दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात तणाव निर्माण झाला आहे. आता या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतण्याचा व्हिडीओही या समाजकंटकांनी व्हायरल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!