Share

इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते?

Published On: 

मुंबई: १९७१ च्या बांगलादेश युद्धात इंदिरा गांधींनी मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण कायम प्रेरणादायी ठरेल. केंद्र सरकारने हा विजय दिवस साजरा केला, पण पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार इंदिराजींनाच विसरले. इंदिरा गांधींना श्रेय द्यायचे नाकारले तरी बांगलादेश युद्धाचा विजय त्यांच्याच नावावर नोंदविला जाईल. लहान मनाच्या राज्यकर्त्याकडून देश महान कसा होणार? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.

देशभक्ती दुर्मिळ झाली आणि बेइमानी बेछूटपणे वावरू लागली तर राष्ट्र हे राष्ट्र राहत नाही. स्वातंत्र्याचा लोप कधी झाला हे कळत नाही. आज दुसरे काय चालले आहे! इंदिरा गांधी यांना वगळून देशाचाच नव्हे, तर जगाचा इतिहास कुणालाच लिहिता येणार नाही, पण आपल्या देशातील ‘खुज्या’ राज्यकर्त्यांना हे सांगणार कोण? १९७१ चे बांगलादेशचे युद्ध भारताने जिंकले. त्यास पन्नास वर्षे झाली. ५० व्या ‘विजय दिना’ निमित्त शूर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्या विजय दिवशी झालेल्या कार्यक्रमात पराक्रमी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे साधे नाव घेण्याचे सौजन्यही नरेंद्र मोदी यांनी दाखवले नाही. इंदिरा गांधींनी धाडस दाखवले नसते तर पाकिस्तानला जन्माची अद्दल घडविताच आली नसती. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे सरळ दोन तुकडे केले व १९४७ च्या फाळणीचा बदला घेतला. त्या भारतीय दिग्विजयास पन्नास वर्षे झाली. हा विजय दिवस देशाच्या इतिहासातील सुवर्ण क्षणच ठरला.

तेव्हाचे जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींच्या पराक्रमाचा उल्लेख ‘दुर्गा’ असाच केला. भारताच्या शौर्यास तेव्हा संपूर्ण जगाने अभिवादन केले. बांगलादेश युद्धातील विजय हा त्यांच्या जीवनातील पराक्रमाचा परमोच्च क्षण ठरला. इंदिरा गांधी जगातील शक्तिमान नेत्या म्हणून जगासमोर आल्या. भारताकडे वाकडय़ा नजरेने पाहाल तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे तुकडे करू असा संदेश इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचे साधे नावही घेऊ नये? इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते? असा संतप्त सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!