मुंबई: कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने आता राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे.
‘दोन दिवस आधी पंतप्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात. आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते. हे चित्र बेंगळुरू येथील आहे. धिक्कार!धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!!’ असे ट्वीट करत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही भाजपवर निशाणा साधत संताप व्यक्त केला आहे. ‘बंगळुरूला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. भाजपा मोदींची तुलना शिवरायांशी करते. चंद्रकांत पाटील महाराजांनी व्होट बँक तयार केली असे म्हणून महाराजांचा अवमान करतात. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही.’ असे ट्वीट करत सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे.
दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते..
हे चित्र बेंगळुरू येथील आहे..
धिक्कार!धिक्कार!
उठ मराठ्या ऊठ!! pic.twitter.com/4CSsPSzQJE— Sanjay Raut (@rautsanjay61) December 18, 2021
दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात तणाव निर्माण झाला आहे. आता या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतण्याचा व्हिडीओही या समाजकंटकांनी व्हायरल केला आहे. संजय राऊत यांनी हाच व्हिडिओ पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र ‘हे’ कदापि सहन करणार नाही; काँग्रेसचा इशारा
- इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते?
- अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासन कटिबद्ध- नवाब मलिक’
- ‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल
- ‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल


