Share

‘एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर…’, निलेश राणेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जैतापूर अणुऊर्जा व नाणार प्रकल्पावरून मागील अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका बघायला मिळत आहे. त्यातच आता केंद्र सरकारने जैतापूरमध्ये सहा अणुभट्ट्या उभारण्यासाठी तत्वत: मंजुरी दिली. यानंतर कोकणातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत(Vinayak Raut) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जैतापूर प्रकल्प उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. हा मुद्दा केव्हाच संपलाय, असे विनायक राऊत यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी विनायक राऊतांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’जैतापूर अणुऊर्जा व नाणार प्रकल्पासाठी एकटा कर्मदरिद्री खासदार विनायक राऊत सोडला तर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रकल्पांसाठी इच्छुक आहेत. सगळ्यांची इच्छा आहे कोकणात प्रकल्प यावे जेणेकरून बेरोजगारी कमी होईल. स्वतः एक बालवाडी सुद्धा या खासदाराने आणली नाही गेल्या ७ वर्षात.’

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधतांना विनायक राऊत म्हणाले होते की,’केंद्र सरकार जैतापूर प्रकल्पाचं गाडलेलं मुडदं पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा हा संपल्यात जमा आहे. केंद्र सरकारने यापूर्वीही अशा प्रकारे अनेकदा वक्तव्य केले आहे. पण प्रत्यक्षात जमिनीस्तरावर काहीही होत नाही. जैतापूर प्रकल्पाबाबत अनेकदा केंद्र सरकारने संसदेत उत्तरं दिली आहेत. यामुळे गांभीर्यानं घेण्यासारखं आता त्यात काहीही राहिलेले नाही’, असे राऊत म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!