पुणे : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली असतानाच ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी आरक्षण बचावाची भूमिका घेत ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आरक्षण अबाधित राहावं व मेगा भरती लवकर घेण्यात यावी अशा मुद्द्यांसाठी रस्त्यावर उतरला होता.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिली. त्यामुळेच माजी खासदार आणि ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी आज औरंगाबादमध्ये अखिल भारतीय समता परिषदेतर्फे आभार मोर्चा काढून इथून पुढे मोर्चा न करण्याचं आवाहन केलं आहे.
मात्र ओबीसी जन-मोर्चा, ओबीसी संघर्ष समिती अशा ओबीसी समाजातील संघटनांनी आपले आंदोलन-मोर्चे सुरु ठेवणार असल्याचं स्पष्ट करत ओबीसी समाजाला जागृत करण्यासोबतच इतर प्रलंबित मागण्यांसाठी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांनी पुढील आंदोलनासंदर्भात ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे.
समता परिषद म्हणजे ओबीसी समाज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून विरोधी पक्षापर्यंत जो हिवाळी अधिवेशनावेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची एकवाक्यता झाली ती शब्दछल असल्याची टीका करत त्यांनी ओबीसी समाजाच्या कोणत्याही मागण्या सरकारने अद्याप पूर्ण न केल्याचे देखील सांगितले आहे. ओबीसी समाजाच्या इतर ११ मागण्या देखील प्रलंबित असून त्यात एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांचा देखील समावेश आहे. येत्या काळात अहमदनगर, जालना, पंढरपूर, आदी भागांमध्ये ओबीसी समाजाचे आंदोलन, मोर्चे हे ठरल्याप्रमाणे होणारच असल्याची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पडळकरांच्या बोलवत्या धन्याने त्यांना आवरावे; मुश्रीफांनी दिला इशारा
- पंतप्रधानांच्या ‘हर घर वीज’ उद्दिष्टाला हरताळ; कोटेशन भरूनही राज्यात ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत !
- नव्या कृषि कायद्यांचं श्रेय हवं तर तुम्ही घ्या, पण शेतकऱ्यांना फसवू नका : पंतप्रधान मोदी
- …म्हणून राहुल गांधींची बौद्धिक पातळी हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय? भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- करमाळ्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याच्या खात्म्यासाठी खा. नाईक-निबाळकरांनी मागवलं हेलिकॉप्टर


