Share

…म्हणून राहुल गांधींची बौद्धिक पातळी हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय? भाजप नेत्याने उडवली खिल्ली

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील कृषी कायद्यांना लक्ष्य करत विरोध केला आहे. ‘शेतकऱ्यांचं आंदोलनाचा विषय आता राष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आंतरराष्ट्रीय होतोय. या आंदोलनावर सरकारने त्वरित तोडगा काढून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. गेले २२ दिवस शेतकरी थंडीत कुडकुडत असून सत्ताधारी पक्षाला याची लाज वाटायला हवी.’ अशी विखारी टीका त्यांनी केली आहे.

त्यांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘महोदय, राहुल गांधी यांच्या एकूणच सुमार क्षमतेबद्दल अलीकडेच बाराक ओबामांनी भाष्य केले, विदेशातील अनेक जण या विषयावर बोलले आहेत, म्हणून त्यांचा IQ हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनू शकतो काय?,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते बाराक ओबामा?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ‘अ प्रॉमिस्ड लँड’ हे पुस्तक पब्लिश झाल्यानंतर ह्या पुस्तकाची भारतातही खूप चर्चा झाली. सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल हे पुस्तक माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनी महिन्याभरापूर्वी प्रकाशित केलं होतं.

बराक ओबामा यांनी आपल्या या नव्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक चिंताग्रस्त आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तस त्यांच्याबाबतीत घडत आहे. असं भाष्य ओबामांनी केल्यामुळे या पुस्तकाची भलतीच चर्चा रंगली होती. तर भाजप नेत्यांनी यावरून राहुल गांधी यांची खिल्ली उडवली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!