कोल्हापूर : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेल्या आमदारांना साद घालत पुन्हा माघारी परतण्यासाठी खुली ऑफर दिली होती. यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकांचा भडीमार केला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील अजित पवारांवर अत्यंत खोचक टीका केली होती.
‘अजित पवार दिवसा दिवसाला बदलत राहतात. भाजपचे सरकारे होते तेव्हा तुम्ही अजित पवारांचे तोंड पहिले असेलच, नुसती नोटीस आली तर टीव्ही समोर ढसाढसा रडणारे अजित पवार आता मी मोठा टग्या आहे असा आव आणत आहेत,’ असा जोरदार घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये स्थान मजबूत राहण्यासाठी अजित पवारांना असे विधान त्यांना करावे लागत आहेत. राष्ट्रवादीचा आता अजित पवारंवर विश्वास नाही त्यामुळे तो विश्वास परत मिळवण्यासाठी त्यांना अशी विधाने करावे लागत आहेत, अशी विखारी टीका देखील पडळकरांनी केली आहे.
आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना इशाराच दिला आहे. ‘पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिलेत. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्याने पडळकर यांना आवरावे,’ असं प्रत्युत्तर मुश्रीफांनी दिलं आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
‘पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना निर्माण व्हायला लागली आहे. मधल्या काळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आज राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करु’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांआधी भाजपवासी झालेल्या आमदारांना साद घातली आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगासनाला स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून औपचारिक मान्यता
- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावं आघाडीवर
- मोठी बातमी : कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतली स्मृती इराणी यांची भेट !
- तृणमूल काँग्रेसला खिंडार; दिग्गज नेते सोडू लागले ममता बॅनर्जी यांची साथ
- ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विषय आता आतंरराष्ट्रीय होतोय; सत्ताधारी पक्षाला लाज वाटायला हवी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

