Share

पंतप्रधानांच्या ‘हर घर वीज’ उद्दिष्टाला हरताळ; कोटेशन भरूनही राज्यात ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत !

Published On: 

मुंबई:  संगणकीकरणाच्या युगात विजेशिवाय काहीच शक्य नाही. यामुळे महाराष्ट्रातील विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर सध्या शाळा डिजिटल झाल्या आहेत. वर्क फ्रॉम होम प्राधान्य दिले जात आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या ‘हर घर वीज’ उद्दिष्ट आणि वीज नियामक आयोगाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे.

महाराष्ट्रातील घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, स्ट्रीट लाइट, पाणीपुरवठा, कृषी आणि इतर अशा सर्व गटांतील दीड लाखावर ग्राहकांनी कोटेशन भरून वीज जोडणी मागितली आहे. त्यांना वीज मिळालेली नाही. त्यातील ६३ हजार ७३७ नवीन घरगुती व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना व्यवसाय सुरू करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

शिवाय कृषिप्रधान भारतातील कृषकांना वर्षोनुवर्षे वीज जोडणी दिली जात नाही. ९० हजारांवर शेतकऱ्यांना मागूनही वीज मिळालेली नाही. मागणीनुसार सर्वांना वीज जोडणी देऊन वीज वितरण करण्यात महावितरण कमी पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ऊर्जा मंच ग्राहक प्रतिनिधी हेमंत कपाडिया यांनी यावर एका महिन्यात वीज मिळायला हवी, अन्यथा १०० आठवड्यांप्रमाणे दंडाची तरतूद वीज ग्राहकाने अर्ज केल्यावर आठ दिवसांत जागेचे इन्स्पेक्शन व्हायला हवे. पुढील आठ दिवसांत कोटेशन द्यावे व ग्राहकांनी कोटेशन भरल्यावर ८-१५ दिवसांत वीज जोडणी देणे वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे अनिवार्य आहे. उल्लंघन केल्यास ग्राहक तक्रार करू शकतो. असे म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!