Share

करमाळ्यात दहशत माजवणाऱ्या बिबट्याच्या खात्म्यासाठी खा. नाईक-निबाळकरांनी मागवलं हेलिकॉप्टर

Published On: 

सोलापूर : राज्यात सद्या वेगवेगळ्या भागात बिबट्यांनि धुमाकूळ घातल्याचे वृत्त दिवसेंदिवस वाढत आहे. करमाळा तालुक्यात दहशत माजवणारा बिबट्या अजूनही वनविभागाच्या हातावर तुरी देऊन बिनधास्त वावरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सध्या तो बिबट्या वांगी, सांगवी, ढोकरी, चिखलठाण, शेटफळ, उंदरगाव या भागातील ऊस व केळीच्या शेतात फिरत आहे. उसाची व केळीची दडण असल्याने वन विभागातील अधिकारी व शार्प शूटर यांना बिबट्यास जेरबंद तथा निशाणा साधण्यास कठीण जात आहे. त्यामुळेच आता या बिबट्याचा खात्मा करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांनी वनविभागाला व शार्प शूटरना बिबट्याचा माग काढता यावा यासाठी खास हेलिकॉप्टरची तातडीने व्यवस्था केली आहे. याबाबत माहिती देताना भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले, करमाळा तालुक्‍यात बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. 1 डिसेंबरपासून तालुक्‍यात बिबट्या फिरत आहे. वन विभागाने शार्प शूटर व इतर फौजफाटा उभारूनही अद्याप वन विभागला बिबट्यास जेरबंद करता आले नाही किंवा मारता आले नाही. मागील आठवड्यात खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली. या वेळी त्यांनी बिबट्यास मारण्यासाठी हेलिकॉप्टर देण्याची तयारी दर्शवली होती. 15 दिवस झाले तरी बिबट्या सापडत नसेल्याने खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यानी स्वखर्चाने हेलिकॉप्टर देण्याची व्यवस्था केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!