पुणे : पुणे शहरात अनेक पक्षी आणि प्राणी आपल्याला पाहावयास मिळतात. पुण्यात दोन प्रसिद्ध अभयारण्य आहेत. एक पक्षांसाठी प्रसिद्ध आहे, तर दुसर प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य म्हणजे डॉ.सलीम.अली पक्षी अभयारण्य. आता हे डॉ.सलीम.अली पक्षी अभयारण्य राज्याच्या वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली.
पुण्यातील येरवडा येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने पाठपुरावा करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभयारण्य परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती, या विनंतीला मान देऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज येरवडा येथील पक्षी अभयारण्यात पाहणी करायला आले होते. यावेळी येथील पक्ष्यांना सुरक्षित अधिवास प्राप्त होण्यासाठी महसूल विभागाकडील येरवड्यातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची घोषणा आज आदित्य ठाकरे यांनी केली. एकूणच परिसराची पाहणी केल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला. आदित्य ठाकरे यांनी आज रविवार सकाळी परिसराची पाहणी केली व त्यानांतर वन विभागाकडे अभयारण्य हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले कि, ” डॉ.सलीम.अली पक्षी अभयारण्य परिसरातील पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या परिसरात ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केली आहेत ती वेळेत उठवण्यात यावी याकरता मी लवकरच कार्यवाहीचे आदेश देणार आहे. तसेच परिसराची सुरक्षा गरज लक्षात घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पुणेकर नागरिक पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत असून ते पर्यावरणाची जीवा पाड काळजी घेत असतात. २०३० पर्यंत पुणे शहर हे कार्बन न्यूट्रल शहर व्हावे यासाठी पण आपण प्रयत्न करायला हवेत असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- ‘…तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?’; ओबीसी मुद्द्यावरून अव्हाडांचा सवाल
- ‘…तर मीही अण्णा हजारे सोबत उपोषणाला बसेल’; नवनीत राणा यांचा इशारा
- काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा
- परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; विद्यमान नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय…’; रूपाली पाटलांचा सोमय्यांना टोला

