🕒 1 min read
अमरावती: राज्यात वाईन विक्रीच्या (Wine Sale) निर्णयावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील हा निर्णय मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील अण्णा हजारे यांनी दिला आहे.
वाईन ही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरी तुम्ही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन ठेवत आहात. तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी लावायचे आहे का? तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही. असे हताश उद्गार अन्ना हजारे यांनी काढले आहेत.
या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्या सोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली. किराणा दुकानात वाईन मुळे येणारी पिढी व महिलांचे भविष्य खराब होईल त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.
महत्वाच्या बातम्या:
- परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; विद्यमान नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय…’; रूपाली पाटलांचा सोमय्यांना टोला
- IPL AUCTION 2022: अंडर १९ स्टार राजवर्धन हंगरगेकर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये
- ‘ठाकरे सरकारमध्ये उत्तर देण्याची हिम्मत नाही’; किरीट सोमय्यांची टीका
- उदयन राजे यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर सिद्धार्थ जाधव देखील खुश, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
