Share

‘लबाड लांडगा ढोंग करतंय…’; रूपाली पाटलांचा सोमय्यांना टोला

Published On: 

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) काही दिवसांपूर्वी घोटाळा बाहेर काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेत (PMC) आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यात सोमय्या यांना किरकोळ दुखापत झाली होती. या घटनेनंतर सोमय्या पुन्हा एकदा पुणे महापालिकेत आले होते यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. या सर्व घटनांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी टीका केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Thombre Patil) यांनी सोशल मिडियावर लाईव्ह येऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, पुणे पालिकेत येऊन तुम्ही नक्कीच भ्रष्टाचार बाहेर काढला पाहजे. पण भाजपच्या नेत्यांनी देखील जो भ्रष्टाचार केला आहे तो देखील तुम्ही बाहेर काढला पाहिजे तसेच भ्रष्टाचाराचे नाव घेऊन दिशाभूल करून नाही चालणार त्याची पुराव्यानिशी माहिती द्यावी लागेल, असे आवाहन रूपाली पाटील यांनी केले आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाल्या, ‘लबाड लांडगा ढोंग करतंय, जम्बो कोविडमध्ये दीपा एजन्सीचे लाड कोण पुरतोय’, असा खोचक टोला रूपाली पाटील यांनी लगावला आहे. जम्बो कोविडमध्ये दीपा एजन्सीने देखील घोटाळा केला आहे. तसेच रेमेडेसीव्हीरचा देखील भ्रष्टाचार भाजप नेत्यांनी केला आहे, त्याची सुद्धा चौकशी करा, असे आव्हान रूपाली ठोंबरे पाटील यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!