🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये सत्तेत येऊन आता जवळपास अडीच वर्षे उलटून गेली तरी सत्ताधारी पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण थांबताना काही दिसेना. सत्ताधारी प्रत्येक पक्ष एकमेकांवर राजकीय खेळ्या करण्यात मग्न आहेत. तसाच काहीसा प्रकार आज राज्यातील परभणी तालुक्यात घडला. परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे अध्यक्ष विनोद बोराडे आणि उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील विद्यमान २४ नगरसेवकांनी तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी, औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, एमआयएम व इतर पक्षातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. विद्यमान नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.
मुंबई मधील प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असणाऱ्या टिळक भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नाना पटोले म्हणाले कि, ” राज्यातील अनेक राजकीय पक्षातील असंख्य कार्यकर्ते, मोठे नेते हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. मात्र आम्ही कोणालाही प्रलोभने दाखवून आमच्या पक्षात प्रवेश देत नाही. जे लोक आमच्या पक्षात येतात ते स्वखुशीने येतात. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल किंवा उद्या पडेल अशी भविष्यवाणी रोज केली जात आहे; मात्र आमचे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून हे सरकार आपला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल यात काहीच शंका नाही असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
काँग्रेसमध्ये आज यादवराव जाधव, नवीन जाधव आणि विनोद चव्हाण अश्या मात्तबर नेत्यांनी प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय…’; रूपाली पाटलांचा सोमय्यांना टोला
- IPL AUCTION 2022: अंडर १९ स्टार राजवर्धन हंगरगेकर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्समध्ये
- ‘ठाकरे सरकारमध्ये उत्तर देण्याची हिम्मत नाही’; किरीट सोमय्यांची टीका
- IPL Auction 2022 : चेन्नईने नाकारल्यानंतर फाफ डुप्लेसिसने शेअर केला भावूक व्हिडिओ; म्हणाला..
- IPL AUCTION 2022: गुजरात टायटन्समध्ये ३ कोटीत सोल्ड ‘यश दयाल’ ; जाणून घ्या कोण आहे तो?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
