🕒 1 min read
ठाणे: ठाण्यात राष्ट्रवादीने राज्यस्तरीय ओबीसी (OBC) शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन चक्क ढोल वाजवत मंचावर प्रवेश केला.
जातीचा अभिमान केव्हा येतो, जेव्हा तुम्हाला जात समजते तेव्हा. दुर्देवाने ओबीसींना सर्व हातात मिळालं. त्यामुळे त्यांना जातच समजली नाही. ज्यांना समजली ते पुढे गेले. पण ३५४ जाती आहेत. त्यापैकी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या फक्त १६ ते १७ जाती आहेत. बाकी आजही सर्व जाती दऱ्याखोऱ्यात पाल्यावस्त्यात राहतात, असं यावेळी भाषण करताना आव्हाड म्हणाले.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, आपण जर एक झालो नाही, आपली जर ताकद राजकारण्यांना कळली नाही तर ते आपल्याला गृहित धरतील. कुणीही ओबीसींना गृहित धरता कामा नये त्यासाठी एक व्हा. बिहारमधील मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो तर महाराष्ट्रातील ओबीसी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही? असा सवाल करतानाच आपली संख्या तेवढी आहे. ताकद आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या:
- ‘…तर मीही अण्णा हजारे सोबत उपोषणाला बसेल’; नवनीत राणा यांचा इशारा
- काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा
- परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; विद्यमान नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- IPL AUCTION 2022: वेस्ट इंडिजचा रोमारियो झाला आयपीएलमध्ये करोडपती
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय…’; रूपाली पाटलांचा सोमय्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
