🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक मोठे नेते बाहेर पडले. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेनेतील गळती अजूनही थांबलेली नाही. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतरही शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व नेते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे घाटातील बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली आहे. ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आता सदाभाऊ खोत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना एक ट्विट केले आहे. या अगोदर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हटले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तुम्ही मिठी मारत पाठीत खंजीर खुपसला. असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. इतिहास तपासून मगच बोला, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला पण महाराष्ट्रावर शोककळा आणणारी अभद्र युती कुणी केली? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, तुम्ही पाठीमध्ये खंबीर खूपसला – आदित्य ठाकरे
इतिहास तपासून मगच बोला,
2019च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला पण महाराष्ट्रावर शोककळा आणणारी अभद्र युती कुणी केली?— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 22, 2022
शिवसेना पक्षाला लागलेली गळती पाहता पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरेही शिवसंवाद यात्रेद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद करत आहेत. ठाकरे सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचे काम करणार आहेत. दरम्यान त्यांनी एके ठिकाणी बोलताना बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली आहे. तसेच हे सरकार लवकरच कोसळेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Kolhe | वढू-तुळापूर संभाजी महाराज स्मारक विकास निधीवर स्थगिती ; अमोल कोल्हेंचा शिंदे सरकारला प्रश्न
- Udayanraje Bhosale : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उदयनराजे भोसलेंनी दिले संकेत, म्हणाले…
- Nilesh Rane: “त्या लुक्या…, आदित्य साहेब म्हणायचं…”,निलेश राणेंची ठाकरेंना डिवचले
- Chandrkant Khaire : “ज्या धर्मवीर दिघेंच्या आशीर्वादानं मोठा…”,चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
- Thackray vs Shinde : शिवसेना उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आता निवडणूक आयोग घेणार निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
