Share

Udayanraje Bhosale : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उदयनराजे भोसलेंनी दिले संकेत, म्हणाले…

Published On: 

मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी झाल्या आणि त्यांनी कारभारही सांभाळला आहे. मात्र दुसरीकडे अजूनही राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधी पक्षाकडूनही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे कडाडून टीका सुरू आहे. राज्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे तर कित्येक ठिकाणी जनजीवन उध्वस्त झाले आहे. अशा स्थितीत सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजूनही विस्तार का झाला नाही? असा सवाल विरोधी पक्षांकडून विचारला जात आहे. दरम्यान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे. कारण एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. मात्र आता मंत्रिमंडळात शिंदे घाटातील किती बंडखोर आमदारांना स्थान मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मांजरी मंडळ विस्तारा बाबत मोठे वक्तव्य केले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेकडून तसेच विरोधी पक्षांकडून होणाऱ्या सरकार लवकरच पडणार असल्याच्या वक्तव्याबाबत उदयनराजे यांना विचारले असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून ती लोक असं बोलत आहेत. त्यामुळे हे सरकार येणाऱ्या काळातही पडणार नाही, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

उदयनराजे भोसले मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. पण निश्चितपणे येत्या ३ ते ४ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सध्या राष्ट्रपतीची निवडणूक झाली आहे, सोमवारी त्यांचा शपथविधी होणार आहे. मूर्मू यांचा शपथविधी झाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.” राज्यात बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे सामान्य जनतेचे जनजीवन उध्वस्त झाले आहे. अशा स्थितीत राज्याचा कारभार दोनच व्यक्ती चालवत आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे राज्याच्या जनतेचे संपूर्ण लक्ष आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!