🕒 1 min read
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शिंदे गटाच्या वतीने हिंदु गर्वगर्जना संपर्क यात्रा अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केलं होत. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देत तुम्ही बाळासाहेबांचे केवळ इस्टेटीचे वारसदार आहात. मात्र आम्ही हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
“अरे कोण हा आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरेचं वय ३२ आणि माझं शिवसेनेतील वय ३५ आहे. आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतो” असंही पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा…-
जेव्हा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकनाथ शिंदे यांचे पर्व लिहिले जाईल, असे सांगत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, सायकलवर फिरून आम्ही शिवसेना मोठी केली असल्याचा दावा पाटलांनी केला. १०० पेक्षा जास्त केसेस आमच्यावर आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर एक तरी केस दाखवा, असा सवाल करत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
झेंडा लावणारे आम्ही आहोत-
यापूर्वी देखील गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करते. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला होता.
तुम्ही इस्टेटचे वारसदार होऊ शकता. मात्र विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार हा गुलाबराव पाटील आहे. कोण आदित्य ठाकरे? यांना काय अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा?, असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- 5G Launch | डिजिटल इंडिया मोहिमेला येईल आता दुप्पट गती, देशात 5G नेटवर्क लाँच
- INC | “एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका”
- Ajit Pawar | “शिंदे सरकारमधील काही आमदारांना सत्तेची मस्ती” ; ‘त्या’ प्रकरणावर अजित पवार भडकले
- Neelam Gorhe | “भाजपच्या आश्रयाला राहून काहींना रोजगारही मिळाला” ; नीलम गोऱ्हे यांची सडकून टीका
- Smart farming Update | 5G नेटवर्क मुळे आता शेतकरी करू शकतील स्मार्ट शेती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
