मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्षातील नेत्यांवर आरोप केले जात आहेत. तर शिवसेनेतील नेतेही एकनाथ शिंदे गटावर कडाडून टीका करताना दिसत आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदेंवर तसेच शिंदे घाटातील इतर आमदारांवरही कडाडून टीका केली आहे. ज्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मोठा झाला त्यांनाच विसरला, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
ज्या औरंगाबाद शहरावर शिवसेनेची अनेक वर्षापासून राजकीय पकड होती ती या बंडखोरीमुळे संकटात आल्याचे दिसत आहे. कारण औरंगाबाद मधील अनेक आमदारांनी बंड पुकारून एकनाथ शिंदे यांच्या गटाचा हात धरला. त्यामुळे आता या बंडखोरीमुळे औरंगाबादला शिवसेनेतील बंडखोरीचा बालेकिल्ला संबोधले जात आहे. येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेत चंद्रकांत खैरेंनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी भाजपवरही कडाडून टीका केली. ते म्हणाले की, अमित शहा आले, तेव्हा मी त्या बैठकीला होतो. आदित्य ठाकरेदेखील होते. अमित शाह आले आणि अडीच-अडीच वर्षे ठरली. पण नंतर पाच वर्षे आम्हालाच म्हणाले, अशी टीका खैरेंनी यावेळी भाजपवर केली.
बंडखोर आमदारांवरही केली टीका
चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलताना औरंगाबाद मधील शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरही टीका केली. संदीपान भुमरेला मी आमदार निवासमध्ये कोंडून ठेवले, तिकीट दिले आणि आमदार केले. आता त्यांनी गद्दारी केली, असा आरोप त्यांनी केला. अब्दुल सत्तारांवर टीका करताना ते म्हणाले, की हा हिरवा साप सारड्यासारखा रंग बदलतो. आम्ही सिल्लोडमध्ये मोठी सभा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गद्दारांना माफी मिळणार नाही असा इशाराही यावेळी खैरेंनी बंडखोर आमदारांना दिला.
एकनाथ शिंदेंवरही टीका
यावेळी चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकेचे बाण सोडले. १९८८ च्या नंतर एका रिक्षावल्याकडे इतके पैसे कुठून आले, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यामागे ईडी का नाही लागली? आमच्या छोट्या-मोठ्या आमदारांच्या मागे ईडी लागली, असा सवालही खैरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Thackray vs Shinde : शिवसेना उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आता निवडणूक आयोग घेणार निर्णय
- mahesh tapase | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत – महेश तपासे
- 68th National Film Award । ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘तान्हाजी’ला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान
- Naresh Mhaske : “आम्ही संयम राखलेला आहे, आमच्या संयमाचा कुठेतरी…”; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
- Viral Video | एकनाथ खडसे समर्थकाला भर चौकात दोन महिलांनी दिला चोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

