मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे आणि ठाकरे यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. राणे कुटुंबीयांकडून उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा तिखट टीका केली आहे. लुक्या आदित्यला, आदित्य साहेब म्हणायचं सोडून द्या, अशी टीका निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केले आहे.
निलेश राणे हे सातत्याने उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करत असतात. आता त्यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. ‘त्या लुक्या आदित्यला आदित्य साहेब म्हणायचं सोडून द्या.’ अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. निलेश राणेंच्या या टीकेला आदित्य ठाकरे कशा प्रकारचे उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या अगोदरही निलेश राणे त्यांच्या टीकात्मक ट्विट साठी प्रसिद्ध राहिले आहेत. राणे कुटुंबीयांबाबत कोणी काही बोलले की लगेच निलेश राणेंचे टीकास्त्र सुरू होते. ते मागील काही दिवसांपासून शिवसेनेवर कडाडून टीका करत आहेत. त्यांनी याअगोदरही शिवसेनेला आता वर डोके काढू द्यायचे नाही, अशा आशयाचे ट्विट केले होते. ‘देव धर्मातून एक गोष्ट शिकलो, शत्रूला कधीही डोकं वर काढायची संधी द्यायची नसते. कंसाला मारायला कृष्णाला आणि रावणाला मारायला रामाला पुढाकार घ्यावा लागला. बगळा किती ही साधा दिसला तरी पण तो पाण्यात शिकार करायला उभा असतो, ठाकरेंच्या सेनेला डोकं वर काढायची संधी देऊ नका.’ अशी टीका निलेश राणेंनी शिवसेनेवर केली होती.
त्या लुक्या आदित्यला आदित्य साहेब म्हणायचं सोडून द्या.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 22, 2022
महत्वाच्या बातम्या :
- Chandrkant Khaire : “ज्या धर्मवीर दिघेंच्या आशीर्वादानं मोठा…”,चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
- Thackray vs Shinde : शिवसेना उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आता निवडणूक आयोग घेणार निर्णय
- mahesh tapase | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत – महेश तपासे
- 68th National Film Award । ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘तान्हाजी’ला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान
- Naresh Mhaske : “आम्ही संयम राखलेला आहे, आमच्या संयमाचा कुठेतरी…”; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना इशारा


