🕒 1 min read
मुंबई: सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अटकपूर्व जामिनासाठी किरीट सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर त्यांच्या वकिलाने पैसे जमा करण्यासाठी राजभवनात कुठलेही खाते नसल्याने सोमय्या यांनी हा निधी पक्षाला दिला असल्याचा युक्तिवाद केला आहे. यावरूनच राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे.
केवळ सूडबुद्धीने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे जनतेचे पैसै हडप करणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची भाकिते करण्यात मश्गूल आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१३ साली ‘सेव्ह विक्रांत’ मोहिमेंतर्गत तब्बल ५८ कोटी रुपये राज्यपालांचे नाव पुढे करून चक्क भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा केले. असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
कोर्टात युक्तिवाद सुरू असताना किरीट सोमय्या यांच्या वकिलाने सांगितले की, राजभवनाचे बँकेत खाते नव्हते म्हणून किरीट सोमय्यांनी सेव्ह विक्रांतचा निधी हा भाजपच्या खात्यात वळता केला. आता इतका मोठा गैरव्यवहार उघड झाला असताना केंद्रीय तपास यंत्रणा किरीट सोमय्या आणि भाजपच्या मागे लागणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. असे राष्ट्र्वडीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘विक्रांत’साठी जमले फक्त ११००० रुपये; किरीट सोमय्यांचा दावा
सोमय्या बेपत्ता : “आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा…”, गृहमंत्र्यांचे टीकास्त्र
“…म्हणून मी काश्मीर फाईल्स पाहिला नाही”; सोनू निगमचा खुलासा
“११ हजार की ५८ कोटी याचा तपास…”, सोमय्यांच्या खुलास्यानंतर राऊतांचा इशारा
“धमक्या देऊन थायलंड बँकॉकमध्ये पैसे…”, किरीट सोमय्यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊतांचा नवा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
