🕒 1 min read
मुंबई: भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महात्मा जोतिबा फुलेंसोबत केली आहे. यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. काल महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त संबित पात्रा यांनी हे वक्तव्य केले होते.
“भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते देशाच्या पंतप्रधानांची तुलना नेहमीच एखाद्या दैवी शक्तीसोबत करत असतात. ते भगवान विष्णू आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत असेही म्हणत असतात. काल महात्मा जोतिबा फुले यांची जयंती होती तर त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान हे महात्मा जोतिबा फुले यांच्यासारखे समाजसुधारक आहेत असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले. पण तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणवून घेतले, महात्मा जोतिबा फुले म्हणवून घेतले, तरी नंतरच्या काळामध्ये १३० कोटी जनतेमध्ये मी नरेंद्र मोंदीसारखा आहे, असे म्हणणारा एकही भारतीय नसेल.”, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.
काय म्हणाले होते संबित पात्रा?
महात्मा फुले ज्याप्रमाणे समाजसुधारक होते त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांना समाज सुधारकाच्या रूपात पाहण्याची आवश्यकता आहे. ते केवळ एक राजनेते व जागतिक स्तरावरील नेते नाहीत तर ते समाज सुधारकांप्रमाणेच दिवसभर अथक परिश्रम करतात. पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेत सासत्याने योजना राबविल्या आहेत. असे संबित पात्रा यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
“सेव्ह विक्रांतचा निधी भाजपच्या खात्यात जमा”; किरीट सोमय्यांच्या वकिलाकडून गौप्यस्फोट
“सेटिंग करण्याचा प्रयत्न केला पण पप्पू…”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला
मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
“जनतेचे पैसै हडपणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची…”, राष्ट्र्वादीची टीका
‘विक्रांत’साठी जमले फक्त ११ हजार रुपये; किरीट सोमय्यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
