Share

“अरे बाबा तुझ्या घोटाळ्यावर बोल…”, संजय राऊतांचा सोमय्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या गायब असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र आज किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. तर आज सोमय्या यांनी फक्त ११ कोटी जमा झाल्याचे म्हटले आहे. यावरूनच संजय राऊत यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

“अरे बाबा तुझ्या घोटाळ्यावर बोल आधी. Save Vikrant नावावर गोळा केलेल्या पै-पै चे काय केलेस? 58 कोटीचा हिशेब द्यावाच लागेल!”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच गेल्या काही वर्षापासून भाजपचे लोक आमच्यावर आरोप करत आहेत. हवेत काहीही बोलायचं आणि भ्रम तयार करायचा असं हे नाहीये. त्यांनी पैसे गोळा केलेत आणि ५८ कोटीचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे ११ हजार की ५८ कोटी पैसे जमा झाले हा पोलीस तपासाचा भाग आहे. आम्ही राजकीय सुडापोटी कारवाई करत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. “सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमे अंतर्गत फक्त ११ कोटी जमा करण्यात आले होते. १० डिसेंबर २०१३ साली आम्ही सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिम राबवली. मात्र आज १० वर्षांनंतर संजय राऊत म्हणत आहेत की, ५८ कोटी जमा झाले. यापूर्वीही संजय राऊत यांनी ७ आरोप केले आहेत. मात्र एकाचाही पुरावा मुंबई पोलिसांकडे नाही. १७ डिसेंबर २०१३ साली जेव्हा आपण राष्ट्रपती यांना भेटलो तेव्हा शिवसेना नेते गोपीनाथ मुंडेही सोबत होते. त्यामुळे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणे बंद होणार नाही. आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार.”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“सेव्ह विक्रांतचा निधी भाजपच्या खात्यात जमा”; किरीट सोमय्यांच्या वकिलाकडून गौप्यस्फोट

“सेटिंग करण्याचा प्रयत्न केला पण पप्पू…”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

“जनतेचे पैसै हडपणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची…”, राष्ट्र्वादीची टीका

‘विक्रांत’साठी जमले फक्त ११ हजार रुपये; किरीट सोमय्यांचा दावा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!