मुंबई : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर सोशल मिडियावर सक्रीय असल्याचे पहायला मिळते. सध्या ते अनेक मुद्द्यावरून चर्चेत येत आहेत. नुकतेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यानी देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र यावरून त्यांना सोशल मिडीयावर नेटकऱ्यानी ट्रोल केले आहे.
सचिन पिळगावकर यांनी फेसबुकवर कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत एक उर्दू शेर शेअर केला. ‘अगर किशन की तालीम आम हो जाए, तो काम फितनागरों का तमाम हो जाए…,’ हा मौलाना जफर अली खान यांनी शेअर केला. सोबत जन्माष्टमी मुबारक हो.., असेही लिहिले. मात्र या पोस्टमुळे ते चर्चेत आले आहे.

ही पोस्ट पाहून अनेकांनी सचिन यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यानी गोकुळाष्टमी शुभेच्छा वापर केलेल्या उर्दूचा वापर अनेकांना रुचला नाही. यावरून एका नेटकऱ्याने म्हंटले की, गोकुळाष्टमीसारख्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी, हिंदी, संस्कृत असे पर्याय उपलब्ध असताना उर्दूचाच आग्रह का? असा सवाल पिळगावकर यांना केला आहे.

तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हंटले की, अहो सचिन, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात, मराठीचा वापर करा, असा सल्ला एकाने त्यांना दिला. कट्यार नक्की काळजात घुसली की मेंदूत, अशी कमेंट एकाने केली. तर तिसऱ्या एकाने म्हंटले की, श्रीकृष्णाने अख्खी गीता संस्कृतमध्ये सांगितली, त्याच श्रीकृष्णाच्या जन्म तिथीच्या शुभेच्छा उर्दू भाषेत दे आहात? काही विचार करून तरी शुभेच्छा द्यायच्या, असे एका युजरने लिहिले. तुमच्याकडून हीच नकली धर्मनिरपेक्षता अपेक्षित होती, असे म्हणत नेटकऱ्यानी सचिन पिळगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा


