Share

‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. दहीहंडी साजरा करण्यावर देखील बंदी असून मनसेने हिंदू सण होणारच असं म्हणत नियम झुगारून दहीहंडी साजरा केली.

दरम्यान, मंदिरे उघडण्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर हल्लाबोल केला. काल भास्कर जाधव यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पदाचा दुरुपयोग करत मंदिरात अभिषेक केला. याचे फोटो समोर आले असून राज ठाकरे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.

‘कालच कळलं की, भास्कर जाधव यांचा मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत. बाकीच्यांनी मंदिरात जायचे नाही. यांनी सभा घ्यायच्या, मेळावे घायचे आणि त्यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहिहंडी साजरी करायची नाही,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, ‘कुठूनही गर्दी कमी झालेली दिसतेय का? सर्व मैदानावर फूटबॉल सुरु आहे. क्रिकेट सुरु आहे. मुंबईतील महापौर बंगल्यावरील बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून येणाऱ्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. कुठेच काही कमी झालेले नाही. फक्त या सणांवरतीच कसे काय तुम्ही येता? त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील सर्व सैनिकांना सांगितले तुम्ही बिनधास्त दहिहंडी साजरी करा, जे होईल ते होईल’.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!