पुणे: भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. संजय राऊत यांच्यासारखे माणसं बाजारात नाक्यावर पैसे देऊन मिळतात. बाजारात पैसे टाकले की, असे लोक ट्वीट करायला जागोजागी भेटतात, त्यामुळे ज्याला स्वतःला माहिती नाही की तो कोणाचा लोमत्या आहे, मुख्यमंत्री ठाकरेंचा की शरद पवारांचा. तर अशा माणसाबद्दल मी काय बोलणार असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी भाजप सेना संघर्षावरही प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात ठाकरे सरकारने अनधिकृतरित्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्हायात भाजप- शिवसेना संघर्ष त्यांनी सुरु केला आहे. मात्र तो संपवणार आम्ही असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चर्चेचे खुले आमंत्रणही दिले आहे. ते जर चर्चेला आले तर आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान रायगड येथे पोलीस चौकशीला मंत्री राणे गैरहजर राहिल्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्यामागे काही प्रोटोकॉल असतात. शिष्टाचार असतात. असे म्हणत त्यांनी कायद्याला आम्ही सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री असल्याकारणाने दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित असणे नारायण राणेंची जबाबदारी आहे. असेही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांकडून तो ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल – राज ठाकरे
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- …म्हणून नेहमी सांगतो..चड्डीत राहायचं! नितेश राणेंचा शिवसेनेवर शेलक्या शब्दात हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

