मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपकडून राज्यभरात केले जाणाऱ्या शंखनाद आंदोलनानंतर आता मनसेही मंदिरे उघडण्यासाठी मैदानात उतरली असल्याचे म्हटले आहे.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. राज्य शासनाने कोरोनामुळे यंदा दहीहंडीवर बंदी घातली होती. मात्र मनसेने सर्व नियम झुगारून लावत दहीहंडी फोडलीच. त्यामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात सगळं काही सुरळीत सुरू आहे. यात्रा निघाताहेत, मेळावे होताहेत. बिल्डर कामं करून घेण्यासाठी सरकारच्या लोकांना भेटताहेत. त्यातून करोना पसरत नाही, पण सण-उत्सव आले की करोना पसरतो. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे. सगळे सण साजरे झालेच पाहिजेत. सरकारला नियम लावायचेच असतील तर सगळ्यांसाठी एकच नियम लावावा. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला एक नियम असं चालणार नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस जाऊ द्या. नंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठका घेणार आहे. त्यात आम्ही याबाबत चर्चा करूच. सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत नाहीतर सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

