मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजपा, मनसेने याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठिकठिकाणी रात्र, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडण्यात आल्या आहेत.
यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषेद घेवून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि नियमावली यावरुन त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात आज दहीहंडी उत्सव साजरा होत नाही, त्यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
तसेच यावेळी त्यांनी ‘तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष,’ असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितले आहे. असे स्पष्ट मत यावेळी राज ठाकरे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘..म्हणून मी राज्यातील घडामोडींवर काहीही न बोलता शांतपणे पाहतेय’, ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर पंकजा मुंडेंचा खुलासा
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले


