Share

‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात ऐन कोरोना संकटात वाईन शॉप आणि बार सुरू आहेत. राज्यात दारू विक्री सुरू आहे. पण राज्यातील सर्व धर्मियांची मंदिरे बंद आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या अजब कारभाराविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे ठामपणे उभे राहिले आहेत. राज्यातील मंदिरे सुरू करा नाही तर आंदोलन करावे लागेल, असा इशारा अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र शासनाला दिला आहे.

दरम्यान, दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने यंदा देखील बंदी घातली आहे. पंरतू मनसेने आक्रमक भूमिका घेत सरकारचे नियम डावलून लावत आज अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला. याच्याच समर्थनार्थ भूमिका घेत थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’ असा उलट सवाल राज यांनी केला आहे. शिवाय मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी या प्रकरणी शिवसेनेपासून भाजपपर्यंत सर्वांवरच टीका केली.

काय म्हणाले होते अण्णा हजारे?
कोरोनाचे कारण सांगून मंदिरे बंद ठेवली आहेत. केवळ मंदिरे नव्हे तर सर्वच धर्माची प्रार्थनास्थळे बंद आहेत. ती खुली झाली पाहिजेत अशी आपली भूमिका आहे. एका बाजूला दारूची दुकाने उघडी आहेत. मॉल सुरू आहेत. राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत, त्यांना कोरोनाची भीती नाही आणि धार्मिक स्थळांनाच का? हा प्रश्न पडला, त्यामुळे आपण ही भूमिका घेतली. मंदिरे ही आपली संस्कार केंद्रं आहेत. मी स्वत: मंदिरामुळेच घडलो. आजही मंदिरातच राहतो. त्यामुळे संस्कार देणारी मंदिरे बंद ठेवायची आणि पिढी बिघडविणारी दारूची दुकाने सुरू ठेवायची, हे मनाला पटत नाही. सरकार चुकत असेल तर विरोधकांनी आंदोलने केलीच पाहिजेत, असे अण्णा म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!